राहुरी - साई आदर्श मल्टीस्टेटच्या सोनई शाखेच्या स्वमालकीच्या जागेत बांधकामाचे भुमीपुजन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, January 12, 2021

राहुरी - साई आदर्श मल्टीस्टेटच्या सोनई शाखेच्या स्वमालकीच्या जागेत बांधकामाचे भुमीपुजन

 राहुरी /आर्थिक संस्थांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करून जनसेवेचे काम केले पाहिजे संस्थेच्या प्रगतीबरोबरच सामान्यांचे हित ही जोपासले पाहिजे ही जोपासना करत असल्यानेच साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्था इतरांसाठी आदर्शवत ठरत आहेत या संस्थेने आपल्या प्रगतीबरोबरच सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती केली असल्याचे प्रतिपादन श्री शनेश्र्वर देवस्थान ट्रस्ट शिंगणापुरचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले.

 


          साई आदर्श मल्टीस्टेटच्या सोनई शाखेच्या स्वमालकीच्या जागेत बांधकामाचे भुमीपुजन नुकतेच  शनेश्वर देवस्थान ट्रस्ट शिंगणापुरचे अध्यक्ष भागवत बानकर उपाध्यक्ष विकास बानकर ,सरचीटणीस आप्पासाहेब शेटे विश्वस्त पोपटराव कुऱ्हा ,साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे ,डाँ.बाबासाहेब शिरसाठ, बाळासाहेब कुंभकर्ण, बाळासाहेब बडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी बोलताना शनेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले की साई आदर्श मल्टीस्टेट ने सोनई व परिसराच्या वैभवात भर टाकली आहे या संस्थेने अनेकांना आर्थिक आधार दिलेला आहे संस्थेच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यावसायिक आज आपल्या पायावर उभे आहेत आपल्या पारदर्शी कारभारामुळे सर्वांचा विश्वास या संस्थेवर वर बसलेला आहे अगदी थोड्या कालावधीमध्ये या संस्थेने केली भरभराट उल्लेखनीय आहे आज संस्था स्व मालकीच्या जागेमध्ये स्थलांतरित होत आहे त्यास आमच्या शुभेच्छा आहेत.

 

         यावेळी सुरुवातीला प्रास्ताविक यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी माहिती देताना सांगितले की संस्था लवकरच  100 कोटींच्या ठेवी चा पल्ला पार करेल संस्थेने मोबाईल ॲप सुविधा वीज बिल भरणा सुविधा भारतामध्ये कोठेही पैसे पाठवण्याची व स्वीकारण्याची सुविधा डी डी सुविधा आरटीजीएस नेट बँकिंग सोनेतारण सुविधा आधार पेमेंट क्यू आर कोड पेमेंट एटीएम सुविधा संस्थेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत स्व भांडवली संस्था असून ठेवीदारांच्या ठेवीवर आकर्षक व्याज संस्थेच्या माध्यमातून दिले जाते विनयशील व तत्पर सेवा यामुळे संस्थेवर मोठा विश्वास ठेवीदार सभासद यांचा बसलेला आहे संस्थेच्या माध्यमातून अठरा शाखा कार्यरत आहेत त्यातून अनेकांना विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले गेलेले आहे तर शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीची जागा व इमारत असावी या उद्देशाने काही ठिकाणी जागा घेऊन संस्थेने बांधकाम केलेले आहे सर्वच ठिकाणी संस्थेची स्वमालकीची  इमारत असावी असा आमचा उद्देश आहे संस्था सर्वांचे हित जोपासत असताना स्वतःची प्रगती करत आहे अनेकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झालेले आहे या विश्वासास आम्ही कुठे तडा जाऊ देणार नाही.

 

यावेळी शनेश्वर देवस्थानच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी  चांगदेव  साळवे ,अनिल  साळवे ,शिवाजी पालवे,

शिवाजी  घावटे ,  लक्ष्मण साळवे ,संजय लोहकरे ,रेवन्नाथ लकडे,कैलास  पालेकर, कर्मचारी वृंद ,कलेक्शन एजंट आदी उपस्थित होते. आभार शाखाधिकारी  बाबासाहेब दरंदले  यांनी मानले.

 

No comments:

Post a Comment