दौंड - ग्रामपंचातीतील पंचवार्षिक निवडणूक सन २०२१ नुसार जाहिर झाली असून सध्या या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 11, 2021

दौंड - ग्रामपंचातीतील पंचवार्षिक निवडणूक सन २०२१ नुसार जाहिर झाली असून सध्या या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू


 दौंड प्रतिनिधी : (ता.१२) संजय सोनवणे


दौंड तालुक्यातील अनेक  ग्रामपंचातीतील पंचवार्षिक निवडणूक सन २०२१ नुसार जाहिर झाली असून सध्या 

या निवडणुकीचा  प्रचार जोरात सुरू आहे ह्यात उमेदवार म्हणून वाळू माफिया ,मुरूम ,माती,प्रसिद्ध मटका डाॅन जमीनी खरेदी विक्री करणारे दलाल आपली सत्ता टीकुन ठेवण्यासाठी स्वतः व घरातील व्यक्तीला राजकरनामध्ये उतरवले आहे. सदर या उमेदवारांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असतानाही चांगल्या वर्तणुकीचे दाखले मिळाले कसे याची चौकशी पुणे पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र देशमुख यांच्याकडे सर्व सामान्य नागरिक लेखी तक्रार  करणार आहे.सध्या या निवडणुकीच्या प्रचार फेरीरीमध्ये कोणीही मास्क सॅनीटाईझर वापरत नसुन स्वतःच्या प्रचारा सोबत कोरोनाचा  प्रसार पण वाढवत आहे.


तसेच सहाजिकच कोरोनाच्या काळामध्ये ही निवडणूक वृद्ध व लहान बालक यांच्यासाठी घातक ठरणार आहे.आणि उमेदवारांनी आपन निवडून येण्यासाठी मतदार राजाला दारू,मांसाहारी जेवणाची लाच दाखवली असुन,हे जेवन प्रती व्यक्तीला १०० रु  प्रमाने हाॅटेल मालकाने दिले असुन मांसाहारी मध्ये मिळणारे मटण बोकडाचे व बकर्याचे नसुन  सदर जनावरांच्या मटणाचा समावेश होत आहे.त्याच बरोबर बर्ड फ्लू या रोगाने थैमान घातले आहे त्यामुळे स्वस्त मिळणारे चिकन हे कुणीच खाणे पसंत करत नाही.बोकड व बकर्यांचे मटण हे सध्या 600 रुपये किलो दराने मिळत असल्याने त्याचे जेवण देने हे उमेदवार परवडत नाही.नवी शक्कल लढवून या नेत्यांनी अंतुल्या या जनावराचे मटण अवघे 100 रुपये किलो दराने विकत आणून हॉटेल वर पार्ट्याचा बेत आखत आहे.


या गोष्टी नागरिकांच्या लक्षात येताच काही मतदारांनी जेवण टाळले असुन, सध्या मता मागे १५०० ते २००० रुपये घेण्याचे सुरवात केली आहे.या निवडणुकीला आपली सत्ता टीकुन ठेवण्यासाठी बड्या नेत्यांनकडून मोठे पाठबळ मिळत असुन  सर्व सामान्य नागरिकांच्या हिताची की अहिताची हे औचीत्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment