नेवासा - भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन नेवासा तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये साजरा करण्यात आला.
नेवासा येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी सव्वा नऊ वाजता पोलीस परेड मैदानावर नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले.
नेवासा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड बांधवांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment