नेवासा - 3 उमेदवारांची ईश्वर चिठ्ठीने निवड : 52 ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार याप्रमाणे ; मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 18, 2021

नेवासा - 3 उमेदवारांची ईश्वर चिठ्ठीने निवड : 52 ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार याप्रमाणे ; मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार. | C24Taas |

नेवासा - ३ उमेदवारांची ईश्वर चिठ्ठीने निवड : 52 ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार याप्रमाणे ; मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी नेवासा फाटा येथील शासकीय गोदामात आज सोमवार 18 जानेवारी रोजी शांततेत पार पडली. सकाळी 8 पासून सुरू झालेली मतमोजणी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पार पडली. तालुक्यातील 3 गावांमध्ये समान मतदान आल्याने एकनाथ घोडेचोर - तेलकुडगाव, सविता देसाई - प्रवरासंगम, शशिकला खरे - वरखेड या उमेदवारांची ईश्वर चिट्ठीद्वारे कु.हर्षल डहाके यांच्या हस्ते सोडत काढून निवड करण्यात आली.

❗ Telegram वर नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/joinchat/UCwN4RfgabcMDx9hKhYYBg

तर  52 गावातील उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने इरिकेशन कॉलनी, सेंट मेरी स्कूलचा परिसर तसेच शासकीय गोदाम परिसर, नेवासा नेवासा फाटा रोड वर व मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी व नातेवाईकांनी सह मित्रपरिवाराने आपापल्या उमेदवारावर गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत

जिल्हा निवडणूक निरीक्षण अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार परदेशी, नायब तहसीलदार भावले, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, नायब तहसीलदार नारायण कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. तर नेवासा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरासह तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला होता.

  


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


जिल्हा निवडणूक निरीक्षण अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार संजय परदेशी, नायब तहसीलदार भावलेे रावसाहेब, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, नायब तहसीलदार नारायण कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. तर नेवासा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरासह तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments:

Post a Comment