नेवासा तालुक्यातील सरपंच पदासाठी 27 जानेवारीला आरक्षण सोडत. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 23, 2021

नेवासा तालुक्यातील सरपंच पदासाठी 27 जानेवारीला आरक्षण सोडत. | C24Taas |


नेवासा तालुक्यातील सरपंच पदासाठी 27 जानेवारीला आरक्षण सोडत. | C24Taas |

 नेवासा - सन 2020 ते 2025 या कालावधी करिता नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नेवासा तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

   तहसीलदार यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की, नेवासा तालुक्यातील सर्व 114 ग्रामपंचायतीचे सदस्य,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तथा सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ,नेवासा तालुक्यातील सर्व 114 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सन 2020 ते 2025 करिता चक्रानुक्रमे ( रोटेशन ) पध्दतीने

आरक्षीत करावयाचे आहे , याकरिता विशेष सभा दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय नेवासा ( नविन प्रशासकीय इमारत ) येथे आयोजित केलेली आहे. सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ही तहसिलदार सुराणा यांनी केले आहे.तसेच सर्व नागरिकांनी कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षता घेऊन सर्वांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे असे ही सुराणा म्हणाले.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment