नेवासा तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची आरक्षण सोडत दिनांक 27 जानेवारी रोजी नेवासा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत उप विभागीय अधिकारी भाग नगर श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नेवासा तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली. तालुक्यात सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून गेल्या अनेक दिवसापासून मिरवणारे सरपंच पदाचे दावेदार असणाऱ्यांच्या गावात सरपंच पदाचे दुसरेच आरक्षण निघाल्याने गावपातळीवरील स्थानिक नेते आणि सदस्यांसह कार्यकर्ते कभी खुशी कभी गम झाले आहे. कुमारी ऋतुजा जेधे या सात वर्षीय चिमुरडीच्या हस्ते आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment