सभासदांच्या हितांची जपवणूक, हेच स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे उदिष्ट- नंदकुमार पाटील.
नेवासा - स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेमुळे मयत कर्जदार सभासद मोहिनीराज उर्फ बाळ जाधव यांच्या कुटुंबियांना मंजूर अपघाती विम्याचा पाच लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.सभासदांच्या हितासाठी स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेने नेहमीच तत्परतेने कार्य करून त्यांच्या ठेवीचे ही रक्षण केले आहे.सभासदांच्या हितांची जपवणूक करणे हेच स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे उदिष्ट असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष व पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेने कर्जदार सभासद स्वर्गीय मोहिनीराज उर्फ बाळ उत्तमराव जाधव यांचा पाच लाखाचा अपघाती विमा उतरविला होता. दुर्दैवाने मोहिनीराज जाधव यांचे दि.२५ ऑक्टोबर २०१८ रोजी अपघाती निधन झाले,त्यांचा अपघाती विमा घुले पाटील पतसंस्थेने उतरविला असल्याने त्यांनी याबाबत विमा क्लेमसाठी इन्शुरन्स कंपनीकडे पाठपुरावा केला त्यानुसार त्यांचा पाच लाखाचा विमा मजूर झाल्यामुळे सदरचा पाच लाखाचा धनादेश हा पत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील उपाध्यक्ष महंमदभाई शेख(टेलर)यांच्या हस्ते व मोजक्याच संचालकांच्या उपस्थित स्वर्गीय मोहिनीराज जाधव यांचे वारस डॉ.केदार जाधव व कैलास जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी झालेल्या धनादेश प्रदान कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ संचालक डॉ.भाऊसाहेब घुले,नरसूभाऊ लष्करे,कैलास बोरुडे,भाऊसाहेब खंडागळे,ठेवीदार पत्रकार सुधीर चव्हाण,रमेश शिंदे,व्यवस्थापक अंकुश धनक,लक्ष्मण नाबदे,किशोर जाधव,विशाल जायगुडे,अजय पारखे,दत्तू लष्करे,कृष्णा आरले,प्रविण कोरेकर,निखिल सोनवणे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment