नेवासा - शेतीच्या रस्त्यावरून वाद ; १ जणाचा खून. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 30, 2020

नेवासा - शेतीच्या रस्त्यावरून वाद ; १ जणाचा खून. | C24Taas |

नेवासा - शेतीच्या रस्त्यावरून वाद ; १ जणाचा खून. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मंगळवार २९ डिसेंबर रोजी शेतीच्या रस्त्यावरून २ शेतकरी कुटुंबात झालेल्या वादात एक ४० वर्षी व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्याने खून झाल्याची घटना काल सायंकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली. यातील संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. तर दत्तात्रेय ठोंबरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान जखमी दत्तात्रेय ठोंबरे यांना उपचारासाठी नेवासा फाटा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

गोधेगाव शिवारात मयत दत्तात्रेय ठोंबरे आणि महेश भिंगारदे यांची एकमेका शेजारी जमीन तसेच वस्ती आहे. २ दिवसांपूर्वी भिंगारदे यांच्या उसाला तोड आली. यावेळी पूर्वपर असलेला बांधावरील वाहिवाटीच्या रस्त्यावरून या दोन कुटुंबियांत वाद झाला. तो काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला. पुन्हा काल सायंकाळी याच रस्त्यावरून वाद झाले. वादचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी भिंगारदे यांच्या एका मुलाने दत्तात्रेय ठोंबरे त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्याचे समजते. कुर्हाडीचा घाव वर्मी लागल्याने ठोंबरे जागीच कोसळले. 

मयत ठोंबरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment