नेवासा - श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जन्मोत्सव साजरा. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 29, 2020

नेवासा - श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जन्मोत्सव साजरा. | C24Taas |

नेवासा - श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जन्मोत्सव साजरा. | C24Taas |


Live Video -👇

https://www.facebook.com/groups/1352246291459466/permalink/4269457873071612/


यात्रा रद्द झाल्याने देवगड रस्त्यासह परिसरात शुकशुकाट.

नेवासा ( शंकर नाबदे ) भू-लोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे मंगळवारी दि.२९ डिसेंबर रोजी दत्तजयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. असा दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी ६ वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

 यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने ग्रामस्थांसह मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दत्त मंदिरात सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी भास्करगिरी महाराज आणि महंत सुनिलगिरी महाराज तसेच मातोश्री सरूबाई पाटील यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली.

श्री दत्तजयंती निमित्ताने यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शासन नियमांचे पालन म्हणून गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दत्तजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यात्रा रद्द चा निर्णय याआधीच झाल्याने आज पहाटे पासून देवगडकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा,नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते. नेवासा पोलीस स्टेशनचे आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment