सोनईतील राणी दरंदलेची वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षपदी निवड. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 22, 2020

सोनईतील राणी दरंदलेची वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षपदी निवड. | C24Taas |

सोनईतील राणी दरंदलेची वक्तृत्व परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षपदी निवड. | C24Taas |

नेवासा ( शंकर नाबदे ) नेवासा तालुक्यातील सोनई येथील राणी माधव दरंदले यांची वक्तृत्व परिषद (महाराष्ट्र राज्य)च्या पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांना राज्य अध्यक्ष प्रा.शिवराज आनंदकर यांचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.

    राणी दरंदले हीने वक्तृत्व स्पर्धा व सामाजिक कार्यात केलेल्या विशेष योगदानाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य वक्तृत्व परिषदेने कार्यक्षेत्रात वक्तृत्वाचा विकास,प्रसार तसेच सामाजिक,शासकीय व राजकीय योजना राबवाव्या असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. वक्तृत्व परिषदेची ध्येय-धोरणे समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचून संघटन वाढवावे असे पत्रात म्हटले आहे.

   या निवडीबद्दल दरंदले हीचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोपानराव दरंदले,पत्रकार विनायक दरंदले,शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहायक कार्यकारी अधिकारी जी के दरंदले सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment