भानसहिवरे गावात जमिनिच्या वादातून एकाच खून;३ संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे जमिनिच्या वादातून नईम अब्दुललतिफ देशमुख वय ५५ वर्षे या व्यक्तीचा खून झाला असून नेवासा पोलिसांनी ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबद मिळालेल्या माहितीनुसार मयत नईम देशमुख व त्याचे भाऊ कय्यूम, नदीम, मोईन व रफिक लतीफ देशमुख यांच्या मध्ये नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील जमिनीवरून वाद सुरू होते. हे चौघे भाऊ नगर येथे तर कय्यूम हे भानसहिवरे गावात राहत होते.
रविवार दि.20 डिसेंबर रोजी हे चौघे भाऊ नगरहुन भानसहिवरे येथे जमीन वाटप करून भांडण मिटविण्यासाठी आले होते.जमीन वाटपावरून त्यांच्या बाचाबाची झाली.बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.भानसहिवरे येथील ऐतिहासिक
गढीच्या जवळ नईम ला धारदार हत्याराने वार करून मारहाण केल्याचे समजते. त्याला जखमी अवस्थेत नगर येथे उपचरासाठी घेऊन जाताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती समजते.मृतदेह नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे.

नेवासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी,उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह नेवासा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
No comments:
Post a Comment