नेवासा तालुक्यातील खरवंडी मध्ये दत्तजयंती साजरी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 29, 2020

नेवासा तालुक्यातील खरवंडी मध्ये दत्तजयंती साजरी. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील खरवंडी मध्ये दत्तजयंती साजरी. | C24Taas |
नेवासा ( शंकर नाबदे ) - नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील  फाटके वस्तीवर दत्तजयंती साजरी करण्यात आली यावेळी सकाळी १० वाजता श्री.अरूणराव फाटके व त्याचे पत्नी सौ पुनम फाटके याच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर संध्याकाळी ६ सहा वाजता गुलाबराव फाटके व सौ तेजश्री फाटके  याच्या हस्ते पुजा व आरती करण्यात आली.
यावेळी भजनाचा कार्यक्रम ह.भ.प. के एम बाबा फाटके, ह.भ.प. आदिनाथ फाटके, जनार्दन मुरकुटे, पांडुरंग फाटके माधवराव थोरात, यांनी भजने झाले व त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी बबनराव फाटके, नानासाहेब फाटके, आजित फाटके,  ईशान फाटके, पत्रकार विठ्ठल उदावंत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment