श्री क्षेत्र.देवगड संस्थानचा निर्णय;श्रीदत्त जयंती यात्रा रद्द, महाद्वार राहणार बंद.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 15, 2020

श्री क्षेत्र.देवगड संस्थानचा निर्णय;श्रीदत्त जयंती यात्रा रद्द, महाद्वार राहणार बंद.| C24Taas |

 श्री क्षेत्र.देवगड संस्थानचा निर्णय;श्रीदत्त जयंती यात्रा रद्द, महाद्वार राहणार बंद.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

नेवासा (शंकर नाबदे ) - नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा यावर्षी अत्यन्त साधेपणाने साजरा केला जाणार असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची श्रीदत्त जयंती यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थांनचे मठाधिपती महंत भास्करगिरजी महाराज यांनी दिली.

संस्थांनतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,दर वर्षी श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.तथापि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असतांना  सावधगिरीची उपाय योजना म्हणून शासन प्रशासनाने देशातील तसेच राज्यातील सर्वच सार्वजनिक तथा धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनास बंदी केलेली असल्यामुळे तसेच कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या अनुषंगाने शासन प्रशासनाने श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी येथे जारी केलेल्या संचारबंदी आदेशाच्या अनुभवामुळे श्री दत्त मंदिर संस्थान प्रशासन व भाविकांच्या विचार विनिमायातून या वर्षीचा श्रीदत्त जयंती सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे. 

श्री दत्त जन्मसोहळा मुख्य मंदिरातच होणार असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दत्त जन्मसोहळा सर्वाना पाहता यावा यासाठी मंदिर परिसरातील पार्किंगच्या ठिकाणी LED SCREEN लावण्यात येणार...

या निर्णयानुसार या वर्षी श्री दत्त जयंती निमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्रींच्या मंदिरामध्ये स्थानिक सेवेकरी तथा विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत पार पडणार असून नित्याभिषेकही स्थगित ठेवलेले आहेत. 

बाहेरील यात्रा संपूर्णपणे रद्द ठेवण्यात आलेली आहे. दत्त जयंती सप्ताहा दरम्यान दुरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असून भगवान दत्तात्रेय जन्मदिनी म्हणजेच मंगळवार दि.29 डिसेंबर रोजी दुपारी 4 पासून महाद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. 
श्री दत्त जन्मसोहळा मुख्य मंदिरातच होणार असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, श्री दत्त जन्मसोहळा सर्वाना पाहता यावा यासाठी मंदिर परिसर तसेच पाकिंग क्षेत्रात ठिकठिकाणी LED SCREEN लावण्यात येतील. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळावी. 
या निवेदनाद्वारे गुरुवर्य भास्करगिरी महाराज तसेच भक्तगणांतर्फे नम्र आवाहन करण्यात येत आहे  कि, यात्रेसाठी येणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी या वर्षी आपापली दुकाने आणू नये. दिंडी सोहळे आणणाऱ्या भाविकांनी दिंडी सोहळे रद्द करावेत आणि भाविकांनी मंदिर परिसरामध्ये मास्क तथा स्वच्छतेचे व सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment