नेवासा - मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला युवकांचा प्रतिसाद.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, December 6, 2020

नेवासा - मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला युवकांचा प्रतिसाद.| C24Taas |

नेवासा - मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला युवकांचा प्रतिसाद ; रक्तदान शिबिरात केले रक्तदान. | C24Taas |

नेवासा - महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर नेवासा येथे शिवसेना व युवा सेनेच्या शिवसैनिकांकडून महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्यात सद्य स्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने युवासेनाप्रमुख,पर्यावरण मंत्री मा.अदित्यजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेना,युवासेना नेवासा तालुका यांच्या वतीने नेवासा पंचायत समितीच्या हॉलमध्ये रविवार ०६ डिसेंबर २०२० रोजी संभाजीनगर येथील लोकमान्य ब्लड बँक ची एक टीम नेवासा येथे शिबिरासाठी बोलवण्यात आली होती. 

या शिबिरामध्ये युवकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन रक्तदान केले त्याच वेळी अहमदनगर उत्तर चे जिल्हाप्रमुख नीरज नांगरे, शिवसेना नेवासा शहर प्रमुख नितीन जगताप ,युवासेना तालुका प्रमुख कैलास लष्करे,युवासेना उपतालुका प्रमुख सदानंद गाडेकर, विकास लष्करे,राहुल लष्करे ,नितीन लष्करे ,रवींद्र माळी ,अमोल मोरे ,राहुल कुसळकर, शुभम कोकरे ,भरत जाधव ,बाबासाहेब लष्करे, गणेश जाधव, अभिजित राऊत ,सौरभ राऊत, ,प्रदीप भूमकर, सागर शिंदे ,सुनील शिंदे, रोहित लष्करे शुभम मोहिते ,वैभव कर्डिले , अजय शेंडगे आदी शिवसैनिक उपस्थित होते.त्यामध्ये युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता.तर सोशल डिस्टनसह सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

शंकर नाबदे,नेवासा.

No comments:

Post a Comment