राहुरी - डॉ. राहुल बोरा यांना जिवे मारण्याची धमकी - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 9, 2020

राहुरी - डॉ. राहुल बोरा यांना जिवे मारण्याची धमकी


 राहुरी प्रतिनिधी, 

तोंडाला मास्क बांधून ये असे म्हणाल्याचा राग आल्याने कैलास जाधव याने धानोरे येथील मिरा नर्सीग होम या दवाखान्याचा काचेचा दरवाजा तोडून नुकसान केले. तसेच डॉ. राहुल बोरा यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

        डाॅ. राहुल कांतीलाल बोरा वय ४७ वर्षे रा. धानोरे ता. राहुरी. यांचा धानोरे या गावात मिरा नर्सीग होम नावाचा दवाखाना आहे. दि. ८ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मिरा नर्सीग होम या दवाखान्या समोर कैलास नारायण जाधव रा. सात्रळ ता. राहुरी. हा आला. आणि डॉ. राहुल बोरा यांना म्हणाला कि, माझे नख काढायचे आहे. यावेळी डॉ. राहुल बोरा म्हणाले कि, तू तोंडाला मास्क बांधून ये. या गोष्टीचा राग आल्याने त्याने डाॅ. बोरा यांना शिवीगाळ करुन दवाखान्यात असलेला काचेचा दरवाजा तोडून नुकसान केले. आणि तूला जिवंत सोडणार नाही. मारून टाकीन. अशी डाॅ. बोरा यांना धमकी दिली. 

        डाॅ. राहुल बोरा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत कैलास नारायण जाधव याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. २०५०/२०२० भादवि कलम ३३६, ३३७, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. अण्णासाहेब चव्हाण हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment