नेवासा - भानसहिवरे येथील लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोनायोद्धा पुरस्कार जाहीर. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 9, 2020

नेवासा - भानसहिवरे येथील लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोनायोद्धा पुरस्कार जाहीर.

लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणचा कोरोनायोद्धा पुरस्कार पत्रकार विनायक दरंदले यांना जाहीर डाॅ.साळुंके,मलदोडे,देसाई व बोरुडे यांचीही निवड.

नेवासा- लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाण,भानसहिवराच्या वतीने कोरोना प्रतिबंधक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले यांची कोरोनायोद्धा म्हणून निवड करण्यात आली आहे.अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र किर्तने यांनी दिली आहे.

भानसहिवरा येथील श्रीराम विद्यालयात शनिवार दि.१२ डिसेंबर या स्व.मुंडे यांच्या जन्मदिवशी पुरस्कार वितरण व शालेय विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक साहित्याचे वाटप होणार आहे.पत्रकारितेचा पुरस्कार विनायक दरंदले यांना जाहीर झाला आहे.याशिवाय डाॅ.योगेश साळुंके(विशेष आरोग्य सेवा),ॠषिकेश बोरुडे(कार्यालयीन अधिक्षक, संगमनेर),सतिष देसाई(पोलिस कर्मचारी),शंकर मलदोडे(आरोग्य सेवक)हे पुरस्काराचे अन्य मानकरी आहेत.

  उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.सुदर्शन मुंडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिकारी अभिनव त्यागी,जलमित्र सुखदेव फुलारी,मुख्याध्यापक पालवे सर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब ढवाण उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने दत्ता गव्हाणे,सुनिल सानप,रावसाहेब घुले,सुयोग सांगळे,सावळेराम वनवे,मंगेश वनवे आदींनी केले आहे.



No comments:

Post a Comment