राहुरी - चिखलठाण येथील बुळे पठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 8, 2020

राहुरी - चिखलठाण येथील बुळे पठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी

राहुरी - बुळेपठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी


राहुरी प्रतिनिधी,

चिखलठाण येथील बुळे पठार परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने अनेक वाड्या वस्त्यांवर दर्शन घडविले आहे. सोमवारी रात्री ९ वाजता बिबट्याने दोन जणांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. वन विभागाने त्वरित येथे पिंजरा लावावा, अशी मागणी बुळे पठार नागरिकांनी केली आहे.

        बुळेपठार हे राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणारा अतिशय दुर्गम व डोंगराळ भाग आहे. येथे जंगलात वास्तव्य करणाऱ्या बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून लोकवस्तीत होत आहे. आपल्या अन्नाच्या शोधात लोकवस्तीत येत असताना मानवी जीवनाचा या बिबट्याला मोठा आडथळा बनत आहे.  त्यातच अचानक घरासमोर दिसलेल्या बिबट्याने तरुणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मच्छिंद्र दुधवडे (वय ३५ ) यांच्या हाताला जखम झाली तर तावजी केदार (वय ४५) यांच्या पोटाला चावा घेतल्याने जखम झाली. प्रसंगावधान राखून त्याने तेथून पळ काढला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा केला आणि बिबट्या पळून गेला. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोघांनीही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

           सदरील घटना घडूनही वन विभागाने मात्र या घटनेकडे काणाडोळा केला आहे. वन विभाग नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. अधिकारी नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहेत काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. काहीही करा, पण परिसरातील बिबट्या जेरबंद करा, अशी मागणी शेरी चिखलठाण व बुळेपठार ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment