अहमदनगर : पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी ? - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 3, 2020

अहमदनगर : पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी ?

 अहमदनगर : पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांना दिली.

रेखा जरे हत्याकांडात मुख्य आरोपी बाळासाहेब बोठे, बोठे व भिंगारदिवे यांनी दिली हत्येची सुपारी

पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांना दिली.

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सोमवारी (दि. ३०) नगर-पुणे रोडवर जातेगाव फाट्यानजीक हत्या झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस मुख्य सुत्रधाराच्या शोधात होते. गुरुवारी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी व्यतिरिक्त बाळ  ज. बोठे (रा. बालिकाश्रम रोड) हा सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी हत्येची सुपारी इतर आरोपींना दिल्याचेही सांगितले आहे.

सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment