नेवासा - भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून पैसा वसूल करा ! अन्यथा माझ्या दोन्ही किडण्या विकून हा पैसा कोविड मदतीत वर्ग करा - सोपान रावडे. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 10, 2020

नेवासा - भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून पैसा वसूल करा ! अन्यथा माझ्या दोन्ही किडण्या विकून हा पैसा कोविड मदतीत वर्ग करा - सोपान रावडे.

नेवासा - भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून पैसा वसूल करा ! अन्यथा माझ्या दोन्ही किडण्या विकून हा पैसा कोविड मदतीत वर्ग करा - सोपान रावडे.

सोपान रावडे.


नेवासा - महाराष्ट्र शासन कोरोना युद्धाचा मुकाबला करण्यासाठी मोठी मेहनत घेत असून कोविड - १९ मुळे सरकार जनतेच्या आरोग्यासाठी मोठा अर्थिक खर्च करत असल्याने राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला आहे पहिल्या लाटेतच शासनाचे कंबरडे मोडलेले असतांना राज्यावर दुसऱ्या लाटेचा प्रसंग येण्याचा अधिक धोका नाकारता येत नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे शासनातील अधिकारी वर्ग शासनाची फसवणूक करुन भ्रष्टाचार करत असल्याने 'त्या' अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूली करावी अन्यथा माझ्या दोन्ही किडण्या व माझ्या शरिरातील किंमती अवयव काढून घेवून तो पैसे कोरोना निधीत जमा करण्याचे लेखी निवेदन नेवासा तालूक्यातील कांगोणी येथील
 युवक सोपान रावडे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिले असून याच्या प्रति राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना पाठवल्या आहेत.

सोपान रावडे या युवकाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं.च्या लेखापरीक्षण अहवालमधील घेतलेल्या आक्षेपानुसार केलेला भ्रष्टाचार तसेच कोरोनाच्या संकटात ग्रामसेवक/इतरांनी शासनाच्या नियमाप्रमाणे उपस्थित न राहून शासनाची फसवणूक करून घेतलेला पगार वसूल करुन हा निधी कोविडसाठी वर्ग करण्याची मागणीही या युवकाने केलेली आहे. ते पुढे निवेदनात म्हणतात की, वरील मागण्यांसाठी विभागीय आयुक्त साहेबांकडे व इतर संबंधित अधिकार्‍यांकडे वेळोवेळी तक्रार करूनही त्यावर कोणतीही कारवाई केलेली नसून ग्रा.पं.लेखापरीक्षण अहवालनुसार भ्रष्टाचाराची रक्कम वसूल केली नाही तसेच कोरोंनाच्या संकटात काही ‍अधिकार्यांनी शासनाची फसवणूक करून घेतलेला पगार
वसूल करण्यात आलेला नसून उलट या बेकायदेशीर कामासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची पाठराखण केली जात आहे. 
त्यामुळे कोविड युद्धात शासनाची फसवणूक करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करुन हा निधी कोविडसाठी किंवा इतरत्र विकासकामासाठी वापरावा किंवा माझ्या दोन्ही किडण्या व महत्वाचे अवयव विकून येणारा पैसा सरकार जमा करुन कोविडसाठी वापरावा अशी मागणीही सोपान रावडे या युवकाने केली आहे. तक्रारीतील मागणीप्रमाणे दोषींवर कारवाई न केल्यास दि 15/12/2020 रोजी पं.स.नेवासा येथे सोपान रावडे हे त्यांच्या शरीराचे स्वत:हून दान करणार आहे.

No comments:

Post a Comment