राहुरी - महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांना वांबोरी येथील गुंजाळे गावात मारहाण - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 9, 2020

राहुरी - महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांना वांबोरी येथील गुंजाळे गावात मारहाण


 राहुरी प्रतिनिधी, 

चोरून घेतलेले विज कनेक्शन कट केले म्हणून राहुरी येथील महावितरण  कंपनीतील कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांना वांबोरी येथील गुंजाळे गावात मारहाण करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी बाबासाहेब चेडवाल याच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

        दि. ७ डिसेंबर २०२० रोजी दुपारी चार वाजे दरम्यान राहुरी येथील महावितण कंपनीतील कनिष्ठ अभियंता मंगेश तानाजी गांगुर्डे वय ३० वर्षे हे महावितरण कंपनीचे आतंर्गत एक गाव एक दिवस आभियान असे राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील गुंजाळे गाव येथे जावुन महावितरण कंपनीचे विनापरवाना बेकायदा गुंजाळे गावतील एल्टी पोलवरिल अधिकृत घेतलेल्या कनेशनचे केबल वायर मधुन आरोपी बाबासाहेब चेडवाल रा. गुंजाळे, वांबोरी ता. राहुरी. याने बेकायदेशीर रित्या कनेक्शन घेतलेले होते. ते कनेक्शन यातील फिर्यादी व साक्षीदार यांनी सांगितले की, तुमचे कनेक्शन आम्ही कट केले आहे. त्यावेळी आरोपी बाबासाहेब चेडवाल हा मला म्हणाला की, तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या. असे म्हणून कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांना चापटीने मारहान करुन सरकारी कामात अडथळा केला आहे. असे गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

          महावितरणचे कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांनी घटना घडल्या नंतर ताबडतोब आपले वरिष्ठ अधिकारी धिरजकुमार गायकवाड व काही सहकाऱ्यांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. 2049/2020 भादवि कलम 353, 323, 504, 506 प्रमाणे बाबासाहेब चेडवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गणेश शेळके हे करीत आहेत. या घटनेतील आरोपी बाबासाहेब चेडवाल हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment