नेवासा - सर्वसामान्याची पत वाढवून पतसंस्थेची ही पत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा - गुरुवर्य भास्करगिरी महाराज - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 23, 2020

नेवासा - सर्वसामान्याची पत वाढवून पतसंस्थेची ही पत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा - गुरुवर्य भास्करगिरी महाराज

स्व.लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते देवगड येथे प्रकाशन

सर्वसामान्याची पत वाढवून पतसंस्थेची ही पत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा - गुरुवर्य भास्करगिरी महाराज 

नेवासा ( शंकर नाबदे ) नेवासा येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष  व स्व लोकनेते श्री मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या २०२१ दिनदर्शिकेचे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवारी दि.२४ डिसेंबर रोजी प्रकाशन करण्यात आले.सर्वसामान्याची पत वाढवून पतसंस्थेची ही पत कायम कशी राहील असे काम करा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

  श्री क्षेत्र देवगड येथे झालेल्या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष महंमदभाई टेलर यांनी स्वागत केले जेष्ठ संचालक पत्रकार विजय गांधी यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीची व उपक्रमाची माहिती दिली.पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे हार घालून संतपूजन करण्यात आले.

 यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सर्व सभासद ठेवीदार संचालक यांना बरोबर घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उत्कर्षाकडे वाटचाल केली आहे.सभासदांचा विश्वास संपादन करून जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका पतसंस्थेने ठेवली याबद्दल त्यांनी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले.सर्वसामान्य माणसांची पत अगोदर वाढवली तर त्याबरोबर पतसंस्थेची पत वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा यश नक्कीच मिळेल असे सांगून त्यांनी पतसंस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

 यावेळी पतसंस्थेचे संचालक अँड.बाळासाहेब शिंदे यांनी पतसंस्थेच्या २०२१ दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी वेळ दिल्याबद्दल गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्यासह उपस्थित संचालक व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

 यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील, संचालक सर्वश्री मोहिनीराज पारखे,नरसूभाऊ लष्करे, किशोर सोनवणे,दिपक दुधे,विकास शेंडे,कैलास बोरुडे, दिलीप जाधव,म. रा. पगारदार नोकरांचे राज्य फेडरेशन उपाध्यक्ष नवनाथ धोंगडे,ज्ञानेश्वर उगले,किशोर जाधव, लक्ष्मण नाबदे, विशाल जायगुडे,अरुण गायके, विलास पाटील, दत्ता लष्करे, विनायक जाधव,निखील सोनवणे, कृष्णा आरले,अजय पारखे, प्रविण कोरेकर उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment