राहुरी - सुरेश बसाटे यांच्या शेतात अनाधिकृत प्रवेश करून गज व काठीने मारहाण केल्याची घटना - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 3, 2020

राहुरी - सुरेश बसाटे यांच्या शेतात अनाधिकृत प्रवेश करून गज व काठीने मारहाण केल्याची घटना


 राहुरी प्रतिनिधी, 

सुरेश बसाटे यांच्या शेतात अनाधिकृत प्रवेश करून गज व काठीने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे दिनांक २ डिसेंबर रोजी घडलीय. याबाबत चारजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

        सुरेश अशोक बसाटे वय ५० वर्ष राहणार गोटूंबे आखाडा तालूका राहुरी. यांच्या शेतात दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान 1) संदीप अशोक बसाटे 2) ज्ञानेश्वर अशोक बसाटे 3) कुंदा अशोक बसाटे 4) पुजा संदीप भाऊ बसाटे सर्व राहणार गोटुंबे आखाडा ता. राहुरी यांनी अनाधिकृत प्रवेश केला. आणि लोखंडी गज व लाकडी काठीने सुरेश बसाटे यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत राहुरी पोलिसात आरोपी 1) संदीप अशोक बसाटे 2) ज्ञानेश्वर अशोक बसाटे 3) कुंदा अशोक बसाटे 4) पुजा संदीप भाऊ बसाटे सर्व रा.गोटुंबे आखाडा ता. राहुरी. यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 2032 भा. द. वि. कलम 324, 447, 323, 504, 506, 34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

         या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment