राहुरी प्रतिनिधी,
तू परगावचा आहेस घर, जमिन विकून तूझ्या
गावाला निघून जा. असे म्हणून पाच जणांनी मिळून बाळासाहेब काचोळे यांना बेदम मारहाण
करून कोयत्याने वार केला. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दिनांक १६ डिसेंबर
रोजी घडली असून जवरे कुटूंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या
सुमारास या घटनेतील आरोपी १) बाबासाहेब ज्ञानदेव जवरे २) साहेबराव ज्ञानदेव जवरे ३)
गणेश बाबासाहेब जबरे ४) योगेश बाबासाहेब जवरे ५) प्रशांत साहेबराव जवरे सर्व राहणार
वांबोरी, जवरे वस्ती, तालूका राहुरी. यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्रीत जमवून कोयता
लाकडी दांडके व दगड घेवून फिर्यादी बाळासाहेब बापुराव काचोळे वय ५३ वर्ष राहणार जवरे
वस्ती, वांबोरी. यांना व त्यांची पत्नी, सुन, मुलगा यांना म्हणाले की, तू परगावचा आहे.
तू येथील शेत जमिन व घर विकून टाक आणि तुझ्या गावाला परत जा. त्यावर फिर्यादी बाळासाहेब
काचोळे हे त्यांना म्हणाले की, माझी जमिन राहुरी विद्यापीठाने संपादीत केली आहे. त्यामुळे
मी या शिवारातील जमिन खरेदी केली आहे. विनाकराण माझ्याशी वाद घालू नका. असे म्हणताच
वरील पाच आरोपींना राग येवून त्यांनी फिर्यादी बाळासाहेब काचोळे यांना शिवीगाळ करुन
लाथाबुक्याने मारहाण केली. हातातील कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार करून जबर दुखापत
केली. तसेच हातातील लाकडी दांड्याने त्यांच्या पाठीवर, हातावर, पायावर मारुन जबरदस्त
मारहाण केली.
यावेळी बाळासाहेब काचोळे यांची पत्नी, सुन व
मुलगा यांना देखील लाकडी दांड्याने दगडाने मारहाण केली. आणि तुम्ही जर गावात राहीले
तर तुम्हाला एका एकाला तलवारीने कापुन टाकू. अशी जिवे मारण्याची धमकी दिली. बाळासाहेब
कोचोळे यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयाच्या अहवालानुसार
राहुरी पोलिस ठाण्यात जवरे कुटूंबातील पाच जणांवर गुन्हा रजि. नं. २०९१/२०२० भा. द.
वि. कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप
निरीक्षक गणेश शेळके हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment