राहुरी - आठवडे बाजार करणाऱ्या आलम पठाण या व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण ,राहुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळले. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 30, 2020

राहुरी - आठवडे बाजार करणाऱ्या आलम पठाण या व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण ,राहुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळले.

 राहुरी प्रतिनिधी, मनोज साळवे. 

आठवडे बाजार करणाऱ्या आलम पठाण या व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच त्याच्या कडील रोख रक्कमेसह सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. सदर घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यात घडली आहे.


राहुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळले. 

        आलम चाँद पठाण वय २४ वर्ष राहणार फतेबाद तालूका श्रीरामपूर हा तरूण कटलरीचा आठवडे बाजार करून आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह करत आहे. दिनांक २८ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील कणगर येथील आठवडे बाजार असल्याने सदर तरूणाने बाजारात आपली कटलरीची दुकान लावली होती. बाजार आटोपल्यानंतर सदर तरूण उरलेला माल घेऊन मोटरसायकलवर आपल्या घरी फतेबाद येथे जाण्यासाठी निघाला होता. रात्री ८.३० वाजे दरम्यान कणगर तांभेरे रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ दोन मोटरसायकलवर आलेल्या चार अज्ञात भामट्यांनी आलम पठाण याची मोटरसायकल अडवली. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. यावेळी आलम पठाण याच्याकडील २५ हजार रूपयांचा कटलरीचा माल तसेच ४ ते ५ हजार रूपये रोख असा एकूण सुमारे ३० हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन त्या चार अज्ञात भामट्यांनी धूम ठोकली.

        घटनेनंतर आलम चाँद पठाण या व्यापार्‍याने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेली घटना कथन केली. गुन्हा दाखल करण्यासाठी आलम चाँद पठाण हा व्यापारी २९ डिसेंबर रोजी सकाळ पासून दुपारपर्यंत सुमारे चार तास राहुरी पोलिस ठाण्यात बसून होता. पोलिसांनी जाणूनबुजून त्याचा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळले. यावेळी सदर तरूणाने आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांना गुन्हा दाखल करून घेत नसल्या बाबत सांगितले. विलास साळवे यांनी ताबडतोब पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्यामुळे सदर तरूणाचा तक्रार अर्ज दाखल करून घेण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही. 

        पोलिसांच्या या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात छोट्या मोठ्या चोऱ्या तसेच मोटरसायकल चोरांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस म्हणजे खाकी वर्दीतील एक शोभेची वस्तू बनली आहे.

No comments:

Post a Comment