राहुरी - २१ वर्षीय तरूणीची छाती दाबून लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 3, 2020

राहुरी - २१ वर्षीय तरूणीची छाती दाबून लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना


 राहुरी प्रतिनिधी, 

२१ वर्षीय तरूणीची छाती दाबून लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे दिनांक १ डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबत गोकुळ मैड याच्या विरोधात राहुरी पोलिसांत विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

       राहुरी तालूक्यातील म्हैसगांव येथील एक २१ वर्षीय शिक्षण घेत असलेली तरूणी ही दिनांक १ डिसेंबर रोजी किरण अरूण विधाते यांच्या घरासमोर असताना तिने आरोपी गोकुळ पोपट मैड यास विचारले कि, तू किरण यास शिवीगाळ का करतोस? याचा राग येवुन आरोपी गोकुळ मैड याने त्या तरूणीची छाती दाबून, केस ओढले. आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. त्या तरूणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०३३ भा. द. वि. कलम ३५४, ३२३, ५०६ प्रमाणे गोकुळ पोपट मैड राहणार म्हैसगांव तालूका राहुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

          या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टेमकर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment