राहुरीतील बिबट्याचा बंदोबस्त करा ; रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा - क्रांतिसेनेची मागणी. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, December 28, 2020

राहुरीतील बिबट्याचा बंदोबस्त करा ; रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा - क्रांतिसेनेची मागणी.

राहुरीतील बिबट्याचा बंदोबस्त करा ; रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा - क्रांतिसेनेची मागणी.

राहुरी ( प्रतिनिधी - मनोज साळवे ) राहुरी तालुका हद्दीतील कोंढवड, शिलेगाव, केंदळ तसेच परिसरातील अन्य गावांच्या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. वनविभागाने या भागातील बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी क्रांतिसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

         सध्या शेतातील पिकांना पाणी देण्याचे दिवस असल्याने रात्री ऐवजी दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. क्रांतिसेनेचे नेते मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहळ, जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, महेश हिवाळे, किरण म्हसे, भाऊ पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी वनविभाग व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. राहुरी तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याचा सातत्याने वावर सुरू आहे. कोंढवड, शिलेगाव, केंदळ व परिसरातील अन्य गावांच्या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा. 

सध्या पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत. मात्र दिवसा वीज पुरवठा राहत नाही. महावितरण कंपनीने एक आठवडा रात्री व एक आठवडा दिवसा वीज देण्याचे धोरण धरले आहे. बिबट्यासह अन्य हिंस्र प्राण्यांच्या वावरामुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने दिवसा वीजपुरवठा करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे. अन्यथा क्रांतिसेना तिव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. असा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.

No comments:

Post a Comment