राहुरीत "मनुस्मृती दहन" कार्यक्रम जल्लोषात साजरा.
राहुरी प्रतिनिधी,
राहुरी शहरात समविचारी संघटना, संविधान संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, रिपाइ (आठवले), मांतग समाज संघटना यांचे वतीने दि. २५ डिसेंबर रोजी "मनुस्मृती दहन" कार्यक्रम अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर डॉ. जालिंदर घिगे, विलासनाना साळवे, शिरिष गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विलासनाना साळवे यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्ये, मनुस्मृतीचे दुष्परिणाम, स्त्रियांचे हक्क, आर. एस. एस, भाजपचे सरकार, स्त्रियांची अवस्था याबाबत विचार व्यक्त केले. त्यानंतर मनुस्मृतीचे सामुदायीक दहन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संविधान संघर्ष समितीचे निमत्रंक कांतीलाल जगधने यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनुसंगम शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन वंचीतचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, पिंटु साळवे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शिरिष गायकवाड, डॉ. जालिंदर घिगे, अनिल जाधव, विलास साळवे, निलेश म. जगधने, दिलीप गोसावी, कांतीलाल जगधने, पिंटू साळवे, भाऊ वाघ, बापू तनपुरे, शरद मनतोडे, संतोष दाभाडे, रविभारती आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment