दौंड - कानगाव हददीत पेन्ना सीमेंट कंपनीच्या समोर हॉटेल अडोश्याला 'मटक्याची' आकडे-मोड ! - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 24, 2020

दौंड - कानगाव हददीत पेन्ना सीमेंट कंपनीच्या समोर हॉटेल अडोश्याला 'मटक्याची' आकडे-मोड !

 कानगाव हददीत पेन्ना सीमेंट कंपनीच्या समोर हॉटेल अडोश्याला 'मटक्याची' आकडे-मोड !


दौंड प्रतिनिधि : ता.१९ डिसेदौंड तालुक्यातील कानगाव हद्दीत पेन्ना सीमेंट कंपनीच्या समोर असलेल्या हॉटेलच्या अडोश्याला मटक्याची आकडेमोड केली जात आहे.


तसेच येथे ही आकडेमोड मोठ्या प्रमाणात होत असून लाखो रूपयांची उलाढाल होत असते.सदर मटका हा तीन ते चार महिन्यापासून चालू आहे.स्थानिक पातळीवर पोलिस प्रशासनाकडून अर्थपूर्ण व्यवहार हे मैत्रीचे झाल्याने कोणतीच कारवाई होत नाही. सदर कंपनीच्या रस्त्याने महिलावर्गाची रोज रोजगारासाठी ये-जा होत असते.हे अशा जुगाराच्या अड्डामुळे महिला वर्गांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित पाटस पोलीस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक आर एम घाडगे यांना फोन केला असता दोन दिवसांपूर्वीच कारवाई झाली असे सांगण्यात आले.ही कारवाई पोलिस नाईक दशरथ बनसोडे यांनी केली आहे अशी माहिती घाडगे यांनी दिली आहे.कारवाई संदर्भात बनसोडे यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता संपर्क होउ शकला नाही.आता चालू असलेल्या मटक्यावर कारवाई कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment