राहुरी - आरपीआयच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 22, 2020

राहुरी - आरपीआयच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन


 

राहुरी प्रतिनिधी,

आमदारकी व मंत्रीपद मिळाल्यानंतर तनपूरे यांना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय. असा आरोप आरपीआयचे राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदना द्वारे केला आहे. राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय, स्मशानभूमी व वाढीव घरपट्टी बाबत नगरपरिषदेने लवकर निर्णय घेतला नाही तर आरपीआयच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.

      तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी शहर व तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व आरोग्यविषयक असा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत जागा व निधी उपलब्ध असतानाही व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालय नसल्याने अनेकांना उपचारा अभावी आपल्या प्राणाला मुकावे लागले. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी वर्ग शासनाच्या पगारावर ऐशो आरामात राहत आहेत. तर राजकीय लोक या प्रश्नाकडे कानाडोळा करून सर्वसामान्य गोरगरिबांच्या जीवाशी खेळ मांडून आपली राजकीय पोळी भाजण्याचे धन्यता मानत आहे. राहुरी मतदार संघ हा राज्यमंत्री तनपुरे यांचा मतदारसंघ असूनही तनपुरे यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडलेला आहे. नगराध्यक्ष असताना प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी उपोषण केले होते. मात्र आमदारकीच्या निवडणूक नंतर आमदारकी व राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर तनपुरे यांना ग्रामीण रुग्णालयाचा विसर पडला आहे. शासकीय यंत्रणा व राजकीय सत्ताधारी यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे ग्रामीण रुग्णालय इमारत प्रश्न प्रलंबित आहे. शासनाने ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न तातडीने निकाली काढला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन लोकशाही मार्गाने उभारून जोपर्यंत रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल. त्यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी राजकीय व शासकीय यंत्रणा जबाबदार राहील.

           तसेच राहुरी शहर हद्दीतील मागासवर्गीय समाजाच्या स्मशान भूमीच्या जागेचा ही प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. स्मशानभूमी च्या जागेवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करून जागा गिळंकृत केलेली असल्याने स्मशानभूमी अभावी मृतदेहांची अवहेलना सुरू आहे. जिवंतपणी मागासवर्गीयांना न्याय तर मिळतच नाही. मात्र मेल्यानंतरही वंचित ठेवण्याचे काम राजकीय दबावामुळे शासनाच्या हलगर्जीपणामुळे स्मशानभूमी प्रश्न आजवर रखडलेला आहे. स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. अन्यथा स्मशानभूमीवर जिवंतपणी समाधी घेण्याचे आंदोलन मागासवर्गीय समाजाच्या वतीने हाती घेतले जाईल.

         तसेच रमाई घरकुल लाभार्थी व पंतप्रधान घरकुल लाभार्थी योजना यांना नवीन घरपट्टी आकारलेली आहे. परंतु वरील योजना ही शासकीय योजना असून नगर परिषद ही नव्यानेच मनमानी पद्धतीने दुप्पटीने आकारणी करीत आहे. ती अकारणी नियम बाह्य असून सदर घरपट्टी बाबत योग्य ती कारवाई व्हावी. यावर फेरविचार न झाल्यास आरपीआय सर्वसामान्य जनतेसोबत राहून आंदोलन उभारी येईल. असे निवेदनात म्हटले आहे.

        दिलेल्या निवेदनावर विलास साळवे, बबन साळवे, अरूण साळवे, पिंटू साळवे, सचिन साळवे, दादू साळवे, सुनील चांदणे, दिपक साळवे, करण साळवे, रूपक साळवे आदिंच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment