कासुर्डी:खामगावफाटा रेल्वे रुळाचा दोन्ही बाजुस वाळु चा राञीस खेळ चाले. कारवाई मात्र शून्य
दौंड प्रतीनिधी
कासुर्डी हद्दीतील शेतातील वाळूला सोन्याचे महत्व आले आहे . चोरट्या मार्गाने जेसिबी,पोकलेन मशीनने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. ही वाळू शेकडो ट्रक मध्ये भरून पुण्याकडे पाठवली जाते. कासुर्डी गावातील तरुनांनी वाळू मफियानी डेरा टाकला असून या माफियांवर पोलिस प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू तस्करांनी मुजोरी आणि गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
कासुर्डी तलावात याच वाळुमाफीयांनी 5वर्षे वाळु साठी तलावात डेरा टाकला होता माञ या तलावात मोठ्या प्रमानात कारवाया झाल्याने आता या वाळु माफीयांनी ओढे ,व शेतजमीनीवर बस्तानच बसवल आहे महिन्यातच वाळू उपशाचा अकडा हा लाखाहून कोटींचा घरात गेल्याने शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. वाळू माफि यांची दहशत आरेवारीने स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात दडपणा खाली आहेत. कासुर्डी परिसरातील वाळू माफियांना काही राजकीय मंडळी चा मोठ्या प्रमाणात हात आहे.की काय
राजकीय पुढारी आणि वाळू माफिया यांचा बंदोबस्त महसूल यंत्रणा,व पोलीस यंञना कसा करते आणि प्रशासन यावर काय कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दिवस राञ होत असलेल्या वाळू उपशामुळे, रस्ते देखील उखडले आहेत. नागरिकांनी यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकावून गप्प बसवण्याचे प्रकार या वाळू तरुन माफियांकडून होत आहे. वाळू माफियांचा दहशती मध्ये स्थानिक नागरिक संतप्त झाले असून पोलिस प्रशासन , महसूल प्रशासन निद्रा अवस्थेत गेल्याने वाळू माफिया व स्थानिक नागरिकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.
No comments:
Post a Comment