राहुरी - मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख आणावेत. या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 10, 2020

राहुरी - मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख आणावेत. या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ


राहुरी प्रतिनिधी, 

मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख आणावेत. या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. याबाबत बुशरा मन्सुरी यांच्या फिर्यादीवरून नवरा, सासू व सासऱ्यांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

        बुशरा असलम मन्सुरी वय २० वर्षे राहणार सोनगांव सात्रळ ता. राहुरी. या देवटाकळी येथे सासरी नांदत असताना यातील आरोपी यांनी मुंबईला घर घेणेसाठी माहेरून 10,00000 /- रुपये आणावेत. अशी मागणी बुशरा मन्सुरी यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी सदर रक्कम आणली नाही. या कारणावरुन त्यांना 31/10/ 2019 रोजी नंतर 15 दिवसानंतर ते दि. 12/05/2020 दरम्यान वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच उपाशी पोटी ठेवुन शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानूसार राहुरी पोलिसात दि. 09/12/2020 रोजी गुन्हा रजि. नं. 12052/2020 भा. दं. वि. कलम 498 (अ) 323, 504, 506, 34 प्रमाणे आरोपी 1) असलम मुश्ताक मन्सुरी (पती) रा. सटाणा जि. नाशिक 2) रुकसाना मुस्ताक मन्सुरी (सासू) रा. सटाणा जि. नाशिक 3) मुस्ताक सादिक मन्सुरी (सासरा) रा. सटाणा जि. नाशिक 4) ममताज गफुर शेख (सासूची आई) रा. लोणी खुर्द, ता. राहाता 5) गफुर बालम शेख (सासूचे वडिल) रा. लोणी खुर्द, ता. राहाता 6) तोसिफ चंदुलाल मन्सुरी (आत्या सासूचा मुलगा) रा. निफाड 7) कमरुनिसा चंदुलाल मन्सुरी (आत्या सासू) रा. निफाड 8) रशिद गफुर शेख (मामा सासरे) रा. लोणी. 9) निसार गफुर शेख (मामा सासरे) रा. लोणी खुर्द, ता. राहाता. 10) शबनम रेहान शेख (नणंद) रा. पुणे. या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संजय राठोड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment