अहमदनगर - रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 1, 2020

अहमदनगर - रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली.

अहमदनगर - रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली.
अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. राहता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. तर अटक केलेल्या तिघांमध्ये दोन कोल्हार येथील तर एक केडगाव येथील आरोपी आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून सूत्रधार नगर शहरातील असल्याचे समजते. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ ता.पारनेर सोमवारी रात्री रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अटक केलेले दोघे कोल्हार येथील असून ते कोल्हार परिसरात लपून बसले होते तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला होता. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत.

No comments:

Post a Comment