पोलीस नाईक १ एक हजार रुपयाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात.! - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, December 12, 2020

पोलीस नाईक १ एक हजार रुपयाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात.!

संगमनेर येथील पोलीस नाईक याला एक हजार रुपयाची लाच घेताना पकडले.! नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; पोलीस खात्यात खळबळ.

संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका व्यापाऱ्याची पत्नी हरवली असल्याने हे प्रकरण बंद करण्यात यावे यासाठी पोलीस नाईक याने एक हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने याला रंगेहाथ पकडल्याची घटना शनिवार दि.१२ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर  शहरातील एका व्यापाºयाची पत्नी हरवली होती. याबाबत व्यापाºयाने शहर पोलिस ठाण्यात मिसींग दाखल केली होती. मात्र सदर महिला दुसºया दिवशी आढळून आली. महिला सापडल्यामुळे मिसींगचे प्रकरण बंद करण्यात करण्यासाठी देशमुख याने या व्यापाºयाकडे एक हजार रुपयांची मागणी केली.

त्यामुळे व्यापाºयाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला होता. या सापळ्यात देशमुख अलगद अडकला. या कारवाईत लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक श्री.पाटील, श्री. सपकाळे, श्री.बावीस्कर, श्री. महाजन, पोलिस हवालदार गांगुर्डे यांचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी शहर पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाखाची लाच घेतांना पकडल्याची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी पुन्हा एकदा लाच घेणाºया पोलिस नाईक याला पकडण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्रतिनिधी - शाविद शेख,संगमनेर

No comments:

Post a Comment