नेवासा - माळीचिंचोरा येथून 2लाख2800 रुपयाची 39 किंटल तुरीची चोरी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, December 18, 2020

नेवासा - माळीचिंचोरा येथून 2लाख2800 रुपयाची 39 किंटल तुरीची चोरी. | C24Taas |

नेवासा - माळीचिंचोरा येथून 2लाख2800 रुपयाची 39 किंटल तुरीची चोरी. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील व्यापाऱ्याचे दुकानाचे शटर उचकटून अंदाजे 2 लाख 2 हजार 800 रुपये किंमतीची 39 क्विंटल (60 पोती) पांढरी तुर चोरीला गेली आहे.

याबाबद बाबासाहेब सरस्याबाप्पु पुंड (वय 39) वर्ष धंदा व्यापारी रा. माळीचिंचोरा ता.नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादत म्हंटले आहे की,मी माळीचिंचोरा येथे शेतीमाल विकत घेऊन त्याचा विक्री व्यावसाय करतो.

 माझे गुरुदत्त ट्रडींग कंपनी या नावाने दुकान व गोडाऊन माळीचिंचोरा फाटा येथे हॉटेल धनराज समोर आहे. खरेदी केलेला माल सर्व दुकानामधे असतो मी शेतक-याकडुन तुर ,मका,सोयाबीन व ईतर शेती पिके खरेदी करतो. खरेदी केलेल्या मालाच्या नोंदी माझ्या बील बुकास ठेवतो. दि. 13 डिसेंबर 2020 रोजी नेहमी प्रमाणे 

सायंकाळी 07 वाजेच्या सुमारस माझे दुकान बंद करुन दुकानाचे दोन्ही शटर व्यवस्थीत बंद केले होते. दोन्ही शटरला प्रत्येकी दोन कुलुपे व्यवस्थीत लावले होते. त्यानंतर मी माझे वस्तीवर गेलो. दि.14 रोजी सकाळी 07 वाजेच्या सुमारास माझे दुकाना शेजारी राहणारे शुभम खंडु चिंधे यांनी मला फोनद्वारे कळविले की दुकानाचे एक शटर अर्धवट उचकटलेले आहे तुम्ही तात्काळ या. मी लगेच माझे दुकानावर जाऊन खात्री केली आसता दुकानाचे डावे बाजुचे शटर मधोमध उचकटलेले होते. त्यानंतर मी दुकानामधे प्रवेश करुन दुकानामधे ठेवलेल्या मालाची खात्री केली असता मला काही पोती कमी दिसुन आले. 

तसेच जमीनीवर तुर सांडलेली दिसुन आली. तेव्हा माझी खात्री की दुकानामधे चोरी झाली आहे. तेव्हा मी दुकानामधे असलेल्या तुर , सोयाबीन, मका , गहु , ज्वारी यांच्या पोत्यांची खात्री केली असता मला पांढ-या तुरीचे 130 पोत्या पैकी 60 पोती कमी मीळुन आली. तेव्हा मी दुकानाचे बाहेर येऊन पाहीले तेव्हा अंगणामधे तुर सांडलेली होती व चारचाकी वाहणाचे टायरचे निशान दिसत होते. अंदाजे 2 लाख 2 हजार 800 रुपये  किंमतीची 29 क्विंटल (60 पोती) पांढरी तुर  दि.13 रोजी सायंकाळी 07 वाजेच्या ते दि.14 रोजी सकाळी 07 वाजेच्या दरम्यान रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे माळीचिंचोरा फाटा येथील गुरुदत्त ट्रडींग कपनी दुकान व गोडाऊनचे शटर कशाच्यातरी साह्याने उचकाटुन आत प्रवेश करुन चोरी केली आहे.

श्री.पुंड यांनी दिलेल्या या फिर्यादी वरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा र नंबर 952/2020 भादवी कलम 457,380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment