नेवासा - सेल्फी काढण्याच्या नादात गोदावरीच्या पात्रात पडून 21 वर्षीय विवाहितेचा मृत्यू. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 1, 2020

नेवासा - सेल्फी काढण्याच्या नादात गोदावरीच्या पात्रात पडून 21 वर्षीय विवाहितेचा मृत्यू. | C24Taas |

नेवासा - सेल्फी काढण्याच्या नादात गोदावरीच्या पात्रात पडून 21 वर्षीय विवाहितेचा मृत्यू. | C24Taas |
नेवासा - नेवासा येथे सासरी येत असताना शनिवार 28 नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. गोदावरीच्या पात्रात गीता शंकर जाधव (वय 21 वर्षे )रा.नेवासा विवाहितेचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे.
 बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध
याबाबद अधिक माहिती अशी की, गीता शंकर जाधव ही आपल्या भावासह नेवासा येथे आपल्या सासरी येत होती.नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा-गंगापूर तालुक्याच्या मध्य हद्दीवर असलेल्या कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून जाताना गीता हिस फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. फोटो घेण्यासाठी तिने भावाला थांबविले आणि पुलावर फोटो काढले या वेळी पुलाच्या काठड्या जवळ सेल्फी घेताना तिचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली. 
उपस्थितांनी तात्काळ धावपळ करून तिला पाण्याबाहेर काढले. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. 8 महिन्या पूर्वीच गीता हिचा नेवासा येथील तरुणाशी विवाह झाला होता. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना काळाने अचानक घाला घातल्याने खैरे व जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment