नेवासा - गौरी गडाख यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, November 8, 2020

नेवासा - गौरी गडाख यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार. | C24Taas |

नेवासा - गौरी गडाख यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार.| C24Taas |
नेवासा - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या
भावजयी, प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी यांच्यावर सोनई येथील आमरधाममध्ये रविवार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुपारी 12 वाजेपासून सोनईत तालुक्यातील कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध संस्थेच्या पदाधिका-यांचा ओघ सुरु झाला.चार वाजता बसस्थानक जवळील आमरधाम
मध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला.
अंत्यविधीला तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

गौरी यांच्या निधनाने संपूर्ण सोनईकरांना धक्का
बसला आहे. आज सर्व व्यावसायिकांनी दिवाळी सणाचा आठवडे बाजार व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी चार वाजता बसस्थानकाजवळील अमरधाममध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला. उदयन गडाख यांनी अग्नी दिला.
अंत्यविधीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे,जि. प. माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्यासह लोणी व सोनई येथील ग्रामस्थ, विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गौरी गडाख यांच्या निधनाने तालुक्यात सह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇No comments:

Post a Comment