नेवासा/ घोडेगाव - १७ किलो चांदीचे मखर चोरी प्रकरणी रास्तारोको व गावबंद. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, November 30, 2020

नेवासा/ घोडेगाव - १७ किलो चांदीचे मखर चोरी प्रकरणी रास्तारोको व गावबंद. | C24Taas |

नेवासा/ घोडेगाव - १७ किलो चांदीचे मखर चोरी प्रकरणी रास्तारोको व गावबंद. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेले १७ किलो चांदीचे मखर बुधवारी दि.१८ नोहेंबर रात्री चोरी झाले. त्याचा तपास १२ दिवस उलटुनही लागलेला नाही. या चोरीचा तातडीने तपास लावावा, या मागणीसाठी संतप्त घोडेगाव ग्रामस्थ व देवी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवारी घोडेगाव येथील शनिशिंगणापूर चौफुल्यावर रास्ता रोको व गावबंद आंदोलन केले.

 बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध

चोरी प्रकरणातील आरोपीस तत्काळ अटक करावी. १७ किलो चांदीचे नक्षीकाम असणारे मखर पूर्ववत देवीस बसवावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. मंगळवारी सकाळपासून अकरा वाजेपर्यंत गाव बंद ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी शेकडो सह्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले. रास्तारोको दरम्यान नगर-औरंगाबाद रस्त्यावर दुतर्फा ३-४ किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. यामधे प्रथमच महिलाचा लक्षणीय सहभाग जाणवला. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. भाषणबाजी टाळून शांततेच्या मार्गाने पंचवीस मिनिटात रास्ता रोको आटोपला.
आंदोलनकर्त्यांचे निवेदन शेवगावचे डि.वाय.एस.पी. सुदर्शन मुंढे यांनी स्वीकारले. यावेळी सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment