श्री.क्षेत्र देवगड येथे कार्तिक पौर्णिमेला मंदिरातून दर्शन बंद ; मुख दर्शनाची देवगड संस्थांकडून व्यवस्था. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, November 28, 2020

श्री.क्षेत्र देवगड येथे कार्तिक पौर्णिमेला मंदिरातून दर्शन बंद ; मुख दर्शनाची देवगड संस्थांकडून व्यवस्था. | C24Taas |

श्री.क्षेत्र देवगड येथे कार्तिक पौर्णिमेला मंदिरातून दर्शन बंद ; मुख दर्शनाची देवगड संस्थांकडून व्यवस्था. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील देवगड येथे कार्तिक पौर्णिमेला  गाभारा दर्शन बंद करण्यात आले असून सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावून बाहेरूनच मुख दर्शन भाविकांनी घ्यावे असे आवाहन श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

 बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध
रविवारी दि.२९ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिम दुपारी १२.४७ पासून प्रारंभ होत असून सोमवारी पहाटे ६ वाजून ३ मिनिटे असा मुहूर्त आहे.कार्तिक पौर्णिमेला श्रीक्षेत्र देवगड येथे दरवर्षी अंदाजे दोन लाख भाविक भगवान दत्तात्रयांसह येथे असलेल्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षीचा कालावधी कोरोनाच्या महामारीचा असल्याने श्री दत्त मंदिराच्या आतून दर्शन घेणे बंद केले असून यासाठी भाविकांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिर प्रवेशद्वाराच्या कीर्तन मंडपातून बाहेरून भगवान दत्तात्रयांचे व कार्तिक स्वामींचे मुख दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्तिक पौर्णिमेला सामाजिक अंतरासह शासकीय नियमांचे पालन करून गर्दी होणार नाही याची ही काळजी भाविकांनी घ्यावी अशा ही सूचना मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आल्या आहे.कार्तिक पौर्णिमेला होणारे इतर सामुदायिक विधी ही रद्द करण्यात आले असून सोमवारी फक्त दुपारची आरती होईल याची भाविकांनी दखल घेऊन मंदिर व्यवस्थानास सहकार्य करावे असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment