नेवासा - ना.शंकरराव गडाख संपर्क कार्यालयाच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, November 17, 2020

नेवासा - ना.शंकरराव गडाख संपर्क कार्यालयाच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. | C24Taas |

ना.शंकरराव गडाख संपर्क कार्यालयाच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. | C24Taas |

नेवासा येथे नामदार शंकरराव गडाख संपर्क कार्यालयाच्या वतीने शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार देशातील प्रत्येकाला स्फूर्ती व प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अनिल ताके,पोपटराव जिरे,भाऊसाहेब वाघ,अभिजित मापारी, पत्रकार सुधीर चव्हाण,नगरसेवक सचिन वडागळे,किशोर तट्टू,बालू जिरे, गोरखभाऊ घुले,स्वीय सहायक सुनील जाधव,अन्सार शेख उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.यावेळी नंदकुमार पाटील पुढे म्हणाले की वीस टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हा पायंडा त्यांनी पाडला त्यामुळे उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असून त्यांच्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठी नामदार शंकरराव गडाख हे काम करत असल्याचे सांगत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी युवा नेते अनिल ताके,सचिन वडागळे,गोरख घुले यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली व त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याची भूमिका विषद केली.No comments:

Post a Comment