नेवासा - दुधाला 35 रूपये प्रती लीटर दुधाला भाव देण्याची मागणी नेवासा तालुका जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली.
या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका अध्यक्ष अजित वांढेकर,किरण जावळे,अजय शिंदे,इमरान शेख,अरूण कापसे,ॠषीकेश साळुंके,जब्बार शेख यांनी नायब तहसिलदार संजय परदेशी यांना निवेदन दिले.
शासनाने मागच्या महिन्यांमध्ये 1 रू दरवाढ केली होती.मात्र खाजगी व सहकारी दुध संघानी या महिन्यात प्रति लीटर 2 रू कमी केले.शासनाने दरवाढ कमी केलाचा जिआर पाठवलेला नसतांनाही भाव कमी कसे झाले? खाजगी व सहकारी दुध संघ एकत्र बैठक घेऊन दुधाचे दर ठरवुन मनमानी करत आहे. त्यामुळे दुध उत्पादकांवर अन्याय होतो. याला वाचा फोडण्यासाठी जन आधार सामाजिक संघटना च्या वतीने निवेदन देण्यात आले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment