नेवासा - बलात्काराच्या गुन्ह्यातील २ वर्षापासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, November 2, 2020

नेवासा - बलात्काराच्या गुन्ह्यातील २ वर्षापासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. | C24Taas |

नेवासा - बलात्काराच्या गुन्ह्यातील २ वर्षापासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. | C24Taas |
नेवासा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी परि. भापोसे अभिनव त्यागी यांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील २ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नेवासा तालुक्यातील माळिचिंचोरे येथे सापळा रचून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात ११ जुलै २०१८ रोजी फिर्यादी नामे सोफिया ( काल्पनिक नाव ) हिने तोफखाना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ३५१/२०१८ भा.द.वी ३७६ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम २०१३ चे कलम ०३ व ०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मोहसीन बादशहा सय्यद रा. माळीचिंचोरा (ता.नेवासा) हा गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तित्व लपवुन अटक चुकवित होता.
 
या गुन्ह्यातील २ वर्षापासून फरार असलेला आरोपी त्याच्या राहत्या घरी माळिचिंचोरा (ता.नेवासा) येथे येणार असल्याची माहीती गुप्त बात्तमीदारामार्फत प्रभारी पोलिस अधिकारी परि.भापोसे अभिनव त्यागी यांना मिळाल्याने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी नेवासा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस 
अधिकारी परि.भापोसे अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर,पोसई प्रदीप शेवाळे, पोलिस हवालदार तुळशीराम गिते,पो.कॉ प्रताप दहिफळे,पो.कॉ अशोक कुदळे,पो.कॉ शाम गुंजाळ यांनी केली.
आरोपीला अहमदनगर येथील तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment