संगमनेर - संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशीला लाच घेताना पकडले - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, November 3, 2020

संगमनेर - संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशीला लाच घेताना पकडले


 संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशीला लाच घेताना पकडले

नाशिकच्या लाचलुचपत खात्याची कारवाई; एक लाख रुपयांची मागितले तिला लाच


संगमनेर : शाविद शेख


संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी याला एक लाख रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत खात्याच्या पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत माहिती अशी की, शहरातील मालदाड रोड याठिकाणी असलेल्या एमएसईबी कॉलनी मध्ये आतिष संजय डमरे याचे घर आहे. घरी कोणीही नसताना आतिष याने त्याच्याच बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून आतमध्ये प्रवेश करत २ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम. एच. १५, बी.बी. ५७०१), पाच हजार रुपये किमतीची तीन घड्याळे व मोबाईल पावरबॅक असा एकुण ३ लाख १२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यानंतर आतिष याने त्याचा मित्र सुरज वाघ व त्याची पत्नी निकिता वाघ यांच्या मदतीने चोरलेले दागिने नाशिक येथील सोनाराला विकले होते. याप्रकरणी आतिषची आई मंगल संजय डमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील या तिघांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केेला होता. त्यांनतर पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी व सचिन उगले यांनी तपासाची चक्रे फिरवताच यातील आतिष डमरे व सुरज वाघ या दोघांना गोवा राज्यातील कलंगुट बीचवर पकडले होते. त्यानंतर यात  नाशिक येथील एका सराफाचे नाव या प्रकरणात आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी याने या सराफाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी एक लाख रुपये देण्याचे ठरले होते त्यानुसार हा सराफ मंगळवारी दुपारी परदेशी याला संगमनेर शहरातील स्टेडियम जवळ पैसे देण्यासाठी आला असता पैसे घेत असताना त्याचवेळी नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचून राणा परदेशी याला एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment