राहुरी / शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या विकासासाठी साई आदर्श मल्टीस्टेट च्या माध्यमातून आम्ही नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आर्थिक आधारामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा उभारी घेऊ शकतो त्यामुळेच आमचा नेहमी पुढाकार आहे असे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी तालुक्यातील गुहा येथील शेतकरी रवींद्र कोळसे यांना साई आदर्श मल्टीस्टेट च्या माध्यमातून स्वराज टँक्टरचे वीतरण नुकतेच संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या शुभहस्ते तसेच आबासाहेब वाळुंज ,वीष्णुपंत गीते ,कीशोर थोरात ,स्वराज गीते मॅनेजर सचिन खडके,याकुब शेख ,सुनील विश्वासराव आदींच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी बोलताना शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की साई आदर्श मल्टीस्टेट ने सुरुवातीपासूनच सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वांनाच आर्थिक आधार देण्याचे काम केले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा बळीराजा जगला तर सर्व घटकांना त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी चालू असलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे याचाच एक भाग म्हणून संस्थेने रवींद्र कोळसे यांना ट्रॅक्टर साठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आणखीही योजना संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी भविष्यात राबवल्या जाणार आहेत याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment