प्रियकराच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न.
राहुरी प्रतिनिधी,
प्रियकराची विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना दिनांक १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. दरम्यान संदिप नामक प्रियकराला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. सध्या त्या प्रियकरावर अहमदनगर येथील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नाही. मात्र या घटनेची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.
जुनं प्रेम विसरता येत नाही असे म्हटले जाते. असाच काही प्रकार राहुरी फॅक्टरी परिसरात दिनांक १७ नोव्हेंबर रोजी दुपारी घडला. भाऊबीजेला माहेरी आलेल्या विधवा असलेल्या महिलेला विवाह पूर्वीच्या प्रियकराला भेटण्याचा मोह आवरला नाही. दोघे एकमेकांना भेटल्याची माहिती विधवा प्रियेसीच्या कुटुंबियांना समजताच संबंधित प्रियकराला नग्न करून यथेच्छ झोडपण्यात आले. राहुरी फॅक्टरी येथे विधवा प्रियेसी भाऊबीज सणाला माहेरी आली होती. लग्नापूर्वीच्या प्रियकराची भेट घेण्यासाठी जुने प्रेम उफाळून आले. अखेर दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही जुन्या आठवणी जागृत झाल्या. दोघांची भेट झाली. तेव्हा दोघांनी प्रेमाच्या गुलूगुलूू गप्पा मारल्या. दोघांची कुजबूज सुरू असतानाच त्याची भनक विधवा प्रियेसीच्या कुटुंबियांना समजली. संदिप नामक जुन्या प्रियकराने आपल्या मुलीला प्रेम जाळ्यात पुन्हा ओढल्याचे पाहून त्यांचा राग अनावर झाला. संबंधित प्रियकराला घराबाहेर काढत संबंधित कुटुंबियांनी चांगलेच झोडपून काढले. यानंतर कुटुंबियातील महिलांनी पुढे येत त्या त्याला विवस्त्र केले. तसेच फॅक्टरी परिसरात त्या प्रियकराची धिंडही काढण्यात आली. तसेच त्याच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजले आहे. दरम्यान, काहींनी पुढाकार घेत तसा प्रकार होऊ दिला नाही. मारहाण झालेला प्रियकर अत्यवस्थ असल्याचे समजले असून त्याच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, संबंधित प्रियकर हा अद्यापी बेशुद्ध असल्याचे समजले आहे. राहुरी पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच परिसरातही घटनेबाबत गुप्तता पाळली जात आहे.
सदर घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करावे. अशी मागणी फॅक्टरी परिसरातील नागरिक करीत आहेत.
No comments:
Post a Comment