नेवासा तालुक्यात आजपर्यंत 50 व्यक्तींचा मृत्यू ; तर आज गुरुवारी 25 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, November 26, 2020

नेवासा तालुक्यात आजपर्यंत 50 व्यक्तींचा मृत्यू ; तर आज गुरुवारी 25 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |

 
नेवासा तालुक्यात आजपर्यंत 50 व्यक्तींचा मृत्यू ; तर आज गुरुवारी 25 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |


तर तालुक्‍यातील 45 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजपर्यंत तालुक्यात 2675 रुग्ण आढळले तर 2524 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.


नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटरला आज गुरुवार 26 नोव्हेंबर रोजी 172 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 25 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
  • बकूपिंपळगाव - 01 
  • भानसहिवरे - 02 
  • भेंडा खुर्द - 03 
  • कांगोनी - 01 
  • खुपटी - 01
  • माका - 03 
  • मुकिंदपुर - 02 
  • नेवासा खुर्द - 01 
  • पिचडगाव - 03 
  • प्रवरासंगम - 01 
  • रांजणगाव देवी - 02 
  • सौंदाळा - 02 
  • सुरेगाव - 02 
  • तरवडी - 01
असे नेवासा तालुक्यातील 14 गावांमध्ये 25 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
9 नोव्हेंबर पर्यंत तालुक्यात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 11 व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने आज 26 नोव्हेंबर पर्यंत तालुक्यात 50 व्यक्तींची कोरोनामुळे निधन झाल्याची नोंद करण्यात आली आहे...

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2675 झाली आहे. तर आज रोजी 101 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 17 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2524 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 50 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment