नेवासा तालुक्यात गुरुवारी 20 रुग्ण आढळले.| C24Taas |
नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी 88 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 14 व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 01 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 05 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शिक्षकांसह 169 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. या मध्ये
- भेंडा बुद्रुक - 01
- देवगाव - 01
- घोडेगाव - 01
- रांजणगाव - 01
- शिंगणापूर - 07
- तरवडी - 02
- उस्थळ खालसा - 01
- जळका बुद्रुक - 02
- मुकिंदपुर - 01
- नांदूर - 01
- नेवासा खुर्द - 02
असे नेवासा तालुक्यातील 11 गावांमध्ये 20 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.


आज दुपारी 4 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2564 झाली आहे. तर आज रोजी 77 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 04 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2448 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment