नेवासा तालुक्यात शनिवारी 17 रुग्ण आढळले , तर 91 व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी... | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, November 21, 2020

नेवासा तालुक्यात शनिवारी 17 रुग्ण आढळले , तर 91 व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी... | C24Taas |

नेवासा तालुक्यात शनिवारी 17 रुग्ण आढळले.| C24Taas |

तर तालुक्‍यातील शिक्षकांसह 91 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजपर्यंत तालुक्यात 2595 रुग्ण आढळले तर 2469 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज शनिवार 21 नोव्हेंबर रोजी 76 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 16 व्यक्ती तर जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 01 व्यक्ती असे 17 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. या मध्ये
  • पिचडगाव - 01 
  • भानसहिवरे - 04 
  • लांडेवाडी - 01 
  • कांगोनी - 02 
  • घोडेगाव - 01 
  • नेवासा बुद्रुक - 04 
  • नेवासा खुर्द - 01 
  • राजेगाव - 01 
  • शिंगवे तुकाई - 01 
  • मुकिंदपुर - 01
असे नेवासा तालुक्यातील 10 गावांमध्ये 17 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 5 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2595 झाली आहे. तर आज रोजी 87 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 02 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2469 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment