नेवासा - शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेस कमिटी.|C24TAAS| - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 26, 2020

नेवासा - शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेस कमिटी.|C24TAAS|

नेवासा - शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेस कमिटी.|C24TAAS|
नेवासा - केंद्र सरकारने शेतकरी व कामगार यांच्याशी संबंधित आणलेले नविन अन्यायी काळे कायदे तातडीने मागे घ्यावेत यासाठी नेवासा काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातून शेतकरी व कामगाराच्या एक लाख सह्यांचे अभियाना राबवले जात आहे
केंद्र सरकारने शेतकरी व कामगार यांच्याशी संबंधित आणलेल्या कायद्याचा पुनर्विचार करून ते मागे घ्यावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार संपुर्ण महाराष्ट्रभर शेतकरी व कामगार यांच्या सह्यांच्या निवेदनाचे अभियान राबविण्यात येत आहे.
नेवासा तालुका काँग्रेस कमिटीने देखिल या अभियानाची जोरात सुरुवात केली आहे .आज विविध ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये , बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या कायद्याबदल माहिती सांगून हा कायदा शेतकरी व कामगार यांच्या साठी कसा हानिकारक आहे भविष्यात याचे किती वाईट परिणाम होतील याची माहिती देण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ,प्रत्येक कामगार बांधवापर्यंत जाऊन या कायद्याची माहिती देऊन, त्याचे होणारे दुष्परिणाम प्रत्येकास पटवुन देवून प्रत्येक शेतकरी बांधवांस या आंदोलनात सहभागी करून घेण्यात येणार असे स्पष्ट केले, 
तालुका संघटक संदीप मोटे यांनी तालुक्यात एक लाख सह्यांचे अभियान पूर्ण ताकतीने राबविण्यात येणार असे स्पष्ट केले.यावेळी शहराध्यक्ष रंजन जाधव, संघटक संदीप मोटे , सरचिटणीस प्रविण तिरोडकर, सेवा दलाचे अरुण सरोदे, प्रगतशील शेतकरी दत्तू कुऱ्हाट प्रसिद्धी प्रमुख सचिन बोर्डे,NSUI चे सौरभ कसावणे, प्रतीक पवार , गौरव सोनवणे आदींसह शेतकरी व कामगार उपस्थित होते, यावेळी सर्वांच्या सह्याने अभियान राबविण्यात आले.
जोपर्यंत केंद्र सरकार हा अन्यायी कायदा मागे घेत नाही तोपर्यंत देशात काँग्रेस पक्ष शेतकरी व कामगार यांच्यासाठी अविरत लढा देणार , तालुक्यातदेखिल काँग्रेस एक लाख सह्यांचे अभियान राबविनार शिवाय यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार - रंजन जाधव ( शहराध्यक्ष, नेवासा शहर काँग्रेस कमीटी)

-: बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :-
शंकर नाबदे, मो. 9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment