नेवासा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाहनाला आयशरची धडक ; कार्यकर्ते बालंबाल बचावले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, October 27, 2020

नेवासा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाहनाला आयशरची धडक ; कार्यकर्ते बालंबाल बचावले. | C24Taas |

नेवासा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाहनाला आयशरची धडक ; कार्यकर्ते बालंबाल बचावले. | C24Taas |

नेवासा - राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी राहुरी येथे गेलेल्या शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वाहनाला नगर-औरंगाबाद रोड वरील वडाळा बहिरोबा गावा जवळ अपघात झाल्याची घटना दि.26 ऑक्टोबर राजी दुपारच्या सुमारास घडली.यात गाडीतील कार्यकर्त्यांना मुका मार लागला असून चारचाकी वाहानाचे नुकसान झाले आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव तालुक्यातील शिष्टमंडळ अमरापुर, फलकेवाडी,भगूर या भागातील शेतकऱ्यांना घेऊन ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी राहुरी येथे गेले होते.शेवगाव तालुक्यातील विजेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवार दि.26 ऑक्टोबर रोजी राहुरी येथे गेले होते. मंत्री महोदयांची भेट उरकून शिष्टमंडळ हे नेवासाच्या दिशेने येत असताना नगर-औरंगाबाद या महामार्गावर वडाळा बहिरोबा येथे त्यांचे वाहनाला पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक क्र. MH 46 AF 6307 या वाहनाने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हुंडाई आय 20 क्र. MH.16 AT 4973 या चारचाकी कारला पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेने चारचाकी वाहाण रस्त्यावरून रस्ता दुभाजकावर जाऊन आडकली.त्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुका मार बसला. यावेळी वाहनांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, तालुका पक्ष अध्यक्ष प्रवीण मस्के, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, मेजर अशोक भोसले,अमोल देवढे,अमरापुर येथील सरपंच विजय पोटफोडे,नारायण पोटफोडे हे या अपघातातून बालंबाल बचावले. नेवाशाचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे यांनी त्यांना तत्काळ शेजारील रुग्णालयामध्ये आणल्यानंतर उपचार करुन सोडण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे अंबादास कोरडे यांनी यावेळी सर्वांना धीर दिला.
केवळ शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच आम्ही या अपघातातून थोडक्यात बचावले आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम बांधील राहू व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
बाळासाहेब फटांगडे,जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमान शेतकरी संघटना.

यावेळी गेलेल्या शिष्टमंडळास शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या विजेच्या प्रश्नासाठी पुढील आठवड्यामध्ये शेवगाव तालुक्याची आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या शिष्टमंडळास शब्द दिला आहे अशी माहिती शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी दिली.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:

Post a Comment