नेवासा - तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.शंकरराव गडाखांचा नागरीकांच्या वतीने सत्कार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 26, 2020

नेवासा - तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.शंकरराव गडाखांचा नागरीकांच्या वतीने सत्कार. | C24Taas |

नेवासा शहराच्या विकासासाठी व उत्कर्षासाठी निधी कमी पडू देणार नाही - ना.शंकरराव गडाख
नेवासा शहरात विविध विकास कामांसाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल ना शंकरराव गडाख यांचा नेवासा शहरातील नागरीकांनी सत्कार केला.
नेवासा शहरातील विविध विकास कामांसाठी नेवासा नगरपंचायतीला तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचा नेवासा शहरातील नागरिक व नगरसेवकांच्या वतीने सत्कार करण्यात करण्यात आला. नेवासा शहराच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नामदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलतांना दिली.
विजयादशमीच्या मुहूर्तावर नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा शहर परिसरात विविध दालनांचे झाल्यानंतर नेवासा संपर्क कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी नेवासा नगरपंचायतला विविध विकास कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगराध्यक्ष सतीश पिंगळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते सत्काराद्वारे करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले निधी अभावी नेवासा शहराचा विकास खुंटला होता त्यासाठी प्रशांत गडाख अध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आम्ही नगरसेवकांनी नामदार गडाख यांच्याकडे केली होती याबाबत नगरविकास खात्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच नेवासा नगरपंचायतला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 
कोरोनाच्या कठीण काळात देखील नेवासा शहराची विकासाची प्रक्रिया थांबू नये यासाठी नामदार गडाख यांनी नेवासा नगरपंचायतसाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून मंजूर झालेल्या या निधीतून नेवासा शहरातील रस्ते,भुयारी गटारी तसेच सुशोभिकरणाचे काम केले जाईल असे नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी बोलतांना नामदार शंकरराव गडाख म्हणाले की नगरविकास विभागाच्या माध्यमातून तब्बल तीन कोटी रुपयांचा भरभक्कम निधी उपलब्ध झाल्याने नेवासा शहरात विकासात्मक कामे सुरू करता येतील नेवासकरांच्या हितासाठी व शहराच्या विकासासाठी निधीची काळजी करू नका त्यासाठी मी भक्कम आहे नेवासा शहराच्या विकासासाठी व उत्कर्षासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी बोलताना त्यांनी दिली.
नेवासा नगरपंचायतसाठी ७ कोटी ८९ लाख ४२ हजार रुपयांची मागणी आपण या योजनेअंतर्गत निधी म्हणून केली होती 
त्यापैकी ३कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरीत निधी देखील लवकरच मंजूर होणार आहे.नेवासा शहरातील नागरिकांना या निधीतून पायाभुत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.येणाऱ्या काळातही विविध योजनेआंतर्गत नेवासा शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यात येणार असुन त्यांसाठी शासन दरबारी शहरविकासाचे अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याचे ना.गडाख यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी नेवासा शहरातील नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-: बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :-
शंकर नाबदे, मो. 9960313029


No comments:

Post a Comment